श्रीशंकराची आरती
लवथवती विकाळा ब्रह्मांडी माळा | वीर्षे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।। लावण्य सुंदर मस्तकी बाळा | तेथुनिया जल निर्मल वाहे झुळझुळां ।।१।। जय देव जय देव जय श्रीशंकरा | आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ।। धृ०।।
कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा | अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।। विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा | ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। जय देव०।। ।। २।।
देवी दैत्यी सागरमंथन पै केलें । त्यामाजी अवचित हलाहल जें उठिले ।। ते त्यां असुरपणे प्राशन केलें । नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ।। जय देव०॥३॥
व्याघ्रांबर-फणिवरथर सुंदर मदनारी | पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ।। शतकोटीचे बीज वाचे उच्चारी | रघुकुलटिळक रामदासाअंतरी ।। जय देव || ४॥
Comments
Post a Comment