Posts

Showing posts from August, 2019

॥ श्री दत्त आरती॥

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेति नेति शब्द न ये अनुमाना । सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ||१|| सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैसी न कळे ही मात पराही परतली तेथे कैचा हा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत ।।२।। दत्त येऊनिया उभा ठाकला भावे साष्टांगेसी प्रणिपात केला प्रसन्न होउनी आशीर्वाद दिधला जन्ममरणाचा फेरा चुकविला ।।३।। दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तू पणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान ||४||

|| श्री महालक्ष्मी ची आरती ||

श्री महालक्ष्मीची आरती जय देवी जय देवी जय महालक्ष्मी। वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥ करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता। पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता। कमलाकारें जठरी जन्मविला धाता। सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥ जय देवी जय देवी...॥ मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं। झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी। माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी। शशिकरवदना राजस मदनाची जननी॥ जय देवी जय देवी...॥ तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी। सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी। गायत्री निजबीजा निगमागम सारी। प्रगटे पद्मावती निजधर्माचारी॥ जय देवी जय देवी...॥ अमृतभरिते सरिते अघदुरितें वारी। मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारी। वारी मायापटल प्रणमत परिवारी। हे रुप चिद्रूप दावी निर्धारी॥ जय देवी जय देवी...॥

दुर्गा माता आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्ममरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथिनी सुरवरईथरवरदे तारक संजिवनी त्रिभुवनभुवनी पाहता तुज ऐसी नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडिले प्रवाही ते तु भक्तांलागी पावसि लवलाहि जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथिनी सुरवरईश्चरवरदे तारक संजिवनी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां क्लेशांपासुनि सोडवि तोडी भवपाशा आंबे तुजवाचून कोण पुरविल आशा नरहरी तल्लिन झाला पदपंकजलेशा जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथिनी सुरवरईश्चरवरदे तारक संजीवनी जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथिनी सुरवरईश्चरवरदे तारक संजिवनी

श्रीशंकराची आरती

लवथवती विकाळा ब्रह्मांडी माळा | वीर्षे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।। लावण्य सुंदर मस्तकी बाळा | तेथुनिया जल निर्मल वाहे झुळझुळां ।।१।। जय देव जय देव जय श्रीशंकरा | आरती ओवाळू तुज कर्पुरगौरा ।। धृ०।। कर्पुरगौरा भोळा नयनी विशाळा | अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।। विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा | ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। जय देव०।। ।। २।। देवी दैत्यी सागरमंथन पै केलें । त्यामाजी अवचित हलाहल जें उठिले ।। ते त्यां असुरपणे प्राशन केलें । नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ।। जय देव०॥३॥ व्याघ्रांबर-फणिवरथर सुंदर मदनारी | पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ।। शतकोटीचे बीज वाचे उच्चारी | रघुकुलटिळक रामदासाअंतरी ।। जय देव || ४॥

श्री गणपतीची आरती

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगीसुंदर उटी शेंदुराची| कंठी झरके माल मुक्ताफळाची ||१|| जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शनमात्रे मनकामना पुरती || रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा | चंदनाची उटी कुंकुमकेशरा | हिरेजडित मुकुट शोभतो बरा | रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ||2|| लंबोदर पितांबर फनी वरवंदना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावेसुरवंदना | जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शनमात्रे मनकामना पुरती ||३||

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Image